- मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच.विजयशंकर शनिवारी आरेवाडीच्या बिरोबा बनाला भेट देणार : शिवाजी ओलेकर सर यांनी दिली माहिती
- कवठेमहांकाळ दि 13.
- शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी मेघालय राज्याचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर कवठे महांकाळ तालुक्यातील बिरुदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरेवाडीत बन येथे भेट देऊन बिरोबा देवाचे दर्शन घेणार आहेत अशी माहिती कवठेमहांकाळ तालुक्याचे बहुजन नेते शिवाजी ओलेकर सर यांनी दिली
- आरेवाडीच्या इतिहासात प्रथमच देशातील एखाद्या राज्याचा राज्यपाल बिरोबाच्या दर्शनासाठी येत असल्याने या दौऱ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर राज्यातील धनगर समाजाच्या असणाऱ्या समस्या,समाजाचे राहणीमान,दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत.लोकसंस्कृतीचे माहेरघर असलेल्या आरेवाडीच्या ज्या गजनृत्याने देशातील विविध कला महोत्सवात भाग घेतला,ज्या गजनृत्याने आरेवाडीचे नाव साता समुद्रापार झळकावले त्या गजनृत्यासोबत इतर लोककला देखील राज्यपाल सी.एच.विजय शंकर यांच्या पुढे सादर केल्या जाणार आहेत.
- मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच.विजयशंकर शनिवारी आरेवाडीच्या बिरोबा बनाला भेट देणार : शिवाजी ओलेकर सर यांनी दिली माहिती
- हा दौरा यशस्वी करण्यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्ट,आरेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेल्या बिरूदेवाच्या लाखो भक्त भाविकांणी तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने शनिवारी होणाऱ्या या भव्यदिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन शिवाजी ओलेकर यांनी केले आहे.
मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच.विजयशंकर शनिवारी आरेवाडीच्या बिरोबा बनाला भेट देणार : शिवाजी ओलेकर सर यांनी दिली माहिती
By -
September 13, 2024
0
Post a Comment
0Comments