yuva MAharashtra रांजणी येथिल श्री शिवाजी सर्व सेवा सोसायटी च्या निवडणुकीत शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

रांजणी येथिल श्री शिवाजी सर्व सेवा सोसायटी च्या निवडणुकीत शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

Admin
By -
0


















रांजणी येथिल श्री शिवाजी सर्व सेवा सोसायटी  च्या निवडणुकीत शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

सत्ताधारी गटाची 40 वर्षाची एकहाती सत्ता नवख्या तरुणांनी उलथवून टाकली... व रांजणी गावच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा 'उदय' झाला.

कवठेमहांकाळ ,दि..५ येथील श्री शिवाजी सर्व सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलने  13 पैकी 11 जागा जिंकत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनल चा मोठा पराभव केला..
यां निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी विकास पॅनलच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला धक्का देत शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनेलने भरगोस यश मिळवले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले व महांकाली सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवनराव भोसले यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले आहे तर शेतकरी विकास पॅनला दोन जागांवर समाधान मानावे लागले. विजय घोषित झाल्यानंतर फटाक्याचे आतिषबाजी करण्यात आली.जेसीबी वर उमेदवार बसून गावातून मिरवणूक काढण्यात काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे ...
उत्तम मारुती पवार 212
 धोंडराम व्यंकटराव भोसले 208 शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे....
 अमोल महादेव पवार 211 
 किसन राजाराम भोसले 221 शिवाजी धोंडी भोसले 214 
सर्जेराव बाजीराव भोसले 210 संजय शिवाजी वांगेकर 208
शिवाजी व्यंकटराव भोसले 211 पद्मिनी रामचंद्र पवार 219
 जयश्री श्रीकांत भोसले 220 
इतर मागास प्रवर्ग
 शंकर माळी 234 
भटक्या विमुक्त जाती विशेष मागासवर्ग बाळासाहेब हरी माने 237 अनुसूचित जाती जमाती 
यशवंत चव्हाण 233





 

 

: शेतकरी सहकार बचाव परिवर्तन पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांची जेसीबीतून विजयी मिरवणूक काढली व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेतले...  
Show quoted text

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)