कृष्णाकाठचे ढाण्यावाघ बापू बिरु वाटेगावकर यांना सांगली येथे अभिवादन.
By -Admin
January 16, 2025
0
सांगली ,प्रतिनिधी दी 17 *कृष्णाकाठचे ढाण्यावाघ, भारताचा रॉबिन हूड,लोकनायक*,बापूबिरु वाटेगावकर यांना सांगली येथे अभिवादन.
दिनांक 16 जानेवारी रोजी बापू बिरु वाटेगावकर यांचा ७ वा स्मृतीदिन. यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे बापू बिरु वाटेगावकर यांच्या प्रतिमेस इंजि. शिवाजी शेंडगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते निवांत कोळेकर सर यांनी बापू बिरु वाटेगावकर यांच्या क्रांतीकारी जीवनकार्या विषयी माहिती विषद केली, इंजिनियर शिवाजी शेंडगे यांनी तरुणांना सामाजिक कार्यात येवून समाजाची सेवा महापुरुषांच्या प्रेरणेने करावी, सघटनेशिवाय तरणोपाय नाही असे मत व्यक्त केले. यावेळी बापू पडोळकर,सावंता खरात साहेब, राजेंद्र थोरात, अनिल कोळेकर, जानकर साहेब आदि उपस्थित होते. तानाजी दुधाळ यांनी सुत्रसंचलन तर उत्तम पांढरे यांनी आभार मानले.
Post a Comment
0Comments