पै.निखिल शिंगाडे एक लंगी या डावावर विजयी.
घाटनांद्रे श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात लहान मोठ्या चटकदार कुस्त्या पार पडल्या.
कवठेमहांकाळ,दि.22 प्रतिनिधी.
श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त
घाटनांद्रे ता.कवठेमहांकाळ येथे घेण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात पैलवान निखिल शिंगाडे कवठेमहांकाळ पैलवान आकाश चव्हाण आटपाडी याला अवघ्या एक मिनिटाच्या आत एक लंगी या डावावर चितपट करुन उपस्थित कुस्ती शैकिनांची चांगलीच टाळ्यांच्या गजरात शाब्बासकीची थाप मिळवली.
या कुस्ती मैदानात कुस्त्या जोडीस जोड आणि तोडीस तोड लागल्याने काही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.परंतु जोडलेल्या सर्व लहान मोठ्या कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शैकिणांची मने जिंकली.
तसेच कुस्ती निवेदक म्हणून पैलवान कृष्णा शेंडगे सर आणि जगन्नाथ शिंदे घाटनांद्रे यांच्या निवेदनाद्वारे कुस्ती मैदानाला चांगलीच रंगत आली होती.
यावेळी लोकनियुक्त सरपंच अमर शिंदे उपसरपंच सुनील कांबळे सोसायटीचे अध्यक्ष तथा यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष कुलदिप शिंदे, पै.महादेव उर्फ बंडू शिंदे माजी उपसरपंच संजय शिंदे, दिलीप पवार, प्रवीण गांधी, नवनाथ चव्हाण, रामभाऊ रास्तेसह कुस्ती शौकीन व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या मैदानास पंच म्हणून पै.हणमंत निकम, पै.सुनील मोहिते, पै.राजेंद्र शिंदे, पै.पंडित मदने,पै. रमेश कांबळे, यांनी काम पाहिले.या कुस्ती मैदानाला शैकिणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Post a Comment
0Comments