अलकुड (एस) येथे बाळूमामाचा महाभंडारा
कवठेमहांकाळ दि 5
अलकुड (एस) येथिल जत कवठेमहांकाळ रस्त्यावरील संत बाळूमामाचा महाभंडारा ७ ते ८ मे अखेर होत आहे. पारायण, किर्तन , हरिपाठ यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. . दि. ७ ते दि ८ मे पर्यंत दररोज पारायण, किर्तन, हरिपाठ, ओव्यांचा कार्यक्रम,बाळूमामा ग्रंथवाचन असे कार्यक्रम होणार आहेत. दि. ८ रोजी पालखी सोहळा होणार आहे. मंदिरापासून सकाळी ९ वाजता पालखीला सुरुवात होणार आहे. परिसरातील मुख्य मार्गावरून अलकुड (एस)फिरून ही पालखी पुन्हा मंदिरापर्यंत येईल.
दि. ८ रोजी भगवान महाराज डोने व सिद्धार्थ महाराज डोने यांची भाकनूक होणार आहे, सकाळी आरती व महाप्रसाद व ह भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या कीर्तनाने यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती संयोजक अतुल शिंदे यांनी दिली..
सात व आठ मे रोजी अलकूड एस येथे संत बाळूमामा यांचा महाभंडारा!!
By -
May 05, 2025
0
Post a Comment
0Comments