अलकूड एस च्या मैदानात पै.तेजा पंजाबीला हरवून पै.सिकंदर शेख विजयी कवठेमहांकाळ दि. 30 अलकुड एस तालुका कवठेमंकाळ येथील भव्य दिव्य कुस्ती मैदानात झालेल्या प्रथम क्रमांकाच्या 2 लाख 51 हजार रुपये बक्षिसाच्या रोमांचक लढतीत झोळी डावावर पैलवान तेजा पंजाबी ला हरवून पैलवान सिकंदर शेख ने विजय मिळविला. अलकूड एस तालुका कवठेमंकाळ येथील श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वास हरूगडे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करून उदघाटन करण्यात आले..यावेळी अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. त्यामध्ये एक नंबरची कुस्ती ही पैलवान तेजा पंजाबी व महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांच्यात दोन लाख 51 हजार रुपये बक्षीसासाठी झाली. यामध्ये अटीतटीच्या लढतीत सिकंदर शेख यांनी आपल्या अनुभव व ताकतीचा उपयोग करून झोळी डावावर तेजा पंजाबीला आसमान दाखवले व विजय मिळवला. यावेळी कुस्ती निवेदक युवराज केचे सर व शिवाजी ओलेकर सर यांनी कुस्ती स्पर्धेचे आपल्या पहाडी आवाजात निवेदन केले व प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी महांकाली सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दीपकराव ओलेकर, मुंबई महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संजय दादा पाटील,जेस्ट नेते शंकर दाजी पाटील, बी.डी.पाटील, युवा नेते दिलीप ओलेकर,भाऊसाहेब कोळेकर,, माजी सरपंच बळवंत बापू यमगर, राजारामबापू जानकर, ,लोकनियुक्त सरपंच दादासाहेब पाटील उपसरपंच विकास वगरे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील,आदिनाथ पाटील,अमोल बंडगर,शिवाजी ओलेकर, अतुल कांबळे,वस्ताद गोरड, सुबराव हनमुने,दत्ता पाटील, दिलीप ओलेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य गणपतराव पाटील, मातोश्री उद्योग समूहाचे चेअरमन गणपती खामकर. इत्यादी उपस्थित होते या स्पर्धेसाठी पंच म्हणून पैलवान नितीन मोकाशी तानाजी दादा यमगर बटू कारंडे, कोंडीबा हुबाले, मनोज एडके,गुरव सर, बाळू खामकर यांनी काम पाहिले, फोटो ओळी : अलकूड एस ता कवठेमहांकाळ येथिल कुस्ती मैदानात पैलवान सिकंदर शेख ने पैलवान तेजा पंजाबी ला झोळी डावावर आसमान दाखवले
Post a Comment
0Comments