आखोणी विकास सोसायटी मधील भ्रष्टाचार ची चौकशी करावी यासाठी आझाद मैदान मुंबई येथे हनुमंत सूळ यांचे उपोषण
By -Admin
March 26, 2025
0
आझाद मैदान मुंबई येथे आखोणी ता.कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथिल विकास सर्व सेवा सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तरी त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी गेले नऊ दिवसापासून हणमंत सूळ यांचे उपोषण चालू आहे
याबाबत अधिक माहिती देताना आंदोलन कर्ते हनुमंत लक्ष्मण सूळ यांनी अशी माहिती दिली की आखोणी विकास सेवा सोसायटी मध्ये कोठ्यावधी रुपये चा भ्रष्टाचार झाला आहे तरी त्याची चौकशी करावी. कर्जत येथील सहाय्यक निबंधक साहेब सूर्यवंशी साहेब यांनी शेजारील तालुका श्रीगोंदा येथील माननीय महेंद्र घोडके लेखा परीक्षक सहकारी संस्था श्रीगोंदा जिल्हा नगर यांच्याकडे दाखवणे दप्तर तपासण्यासाठी दिली असता श्री महेंद्र घोडके यांनी दिनांक 5 /9 /2024 रोजी जाहीर प्रकटन केले होते की गावातील सभासदांना अजून काही मुद्दे असतील तर त्यांनी एकाच वेळी महेंद्र घोडके यांच्याकडे मांडण्यात यावी तसेच मलाही सांगितले की तुझे अजून काही मुद्दे असतील तर जाहीर प्रकटन केले आहे त्यात व गावातील सभासद व मी त्यांना अनेक मुद्दे दिले तरीदेखील त्यांनी त्या मुद्द्याचा विचार न केल्यामुळे मी दिनांक 18 /3 /2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे, कारण अनेक उत्तरे बोगस तयार करून फेरफार बोगस तयार करून वापर करून मोठ्या प्रमाणावर बोगस कर्ज उचललेले आहे व सभासदांच्या सह्या बोगस आहे तसे मी पुरावे सादर केलेले आहेत व कर्जमाफी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आला आहे कर्जमाफी चा आहे तरीदेखील सभासदांचे नवे व जुने कडून सचिव व सहसचिव यांनी व संचालक मंडळ यांनी मोठया प्रमाणात घोटाळा केला आहे तरी आखनी विकास सोसायटी चि चोकशी होऊन सभासदांना न्याय मिळवून द्यावा याच मागणी साठी हॆ आंदोलन चालू केले आहे असे हणमंत सूळ यांनी यावेळी सांगितलं.
Post a Comment
0Comments