yuva MAharashtra अरेवाडी बिरोबा मंदिरास मेघालंय चे राज्यपाल मा. चंद्रशेखर एच विजयशंकर यांची भेट.

अरेवाडी बिरोबा मंदिरास मेघालंय चे राज्यपाल मा. चंद्रशेखर एच विजयशंकर यांची भेट.

Admin
By -
0

कवठेमहांकाळ दि 14 :आरेवाडी ता. कवठेमहांकाळ येथे मेघालयचे राज्यपाल महामहिम मा.चंद्रशेखर एच. विजयशंकर जी यांनी श्री बिरोबा मंदिर येथे भेट दिली व बिरोबा देवाचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान ट्रस्ट व अरेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी महामंहीम राज्यपाल यांचा धनगरी पध्दतीने फेटा बांधून काठी घोंगडे देऊन सत्कार केला.
यावेळी राज्यपाल महोदयांनी श्री बिरोबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर समाज बांधवांशी संवाद साधताना म्हणाले कि धनगर समाज अत्यंत प्रामाणिक समाज आहे. पुढील वेळी मला बिरोबाच्या यात्रेला बोलवा मी महाराष्ट्र च्या राज्यपाल ना सुद्धा सोबत घेऊन येतो.
.
यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक सुनिल साळुंखे, तहसीलदार अर्चना कापसे, पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुख जमादार, देवस्थान अध्यक्ष राहुल कोळेकर, रमेश कोळेकर,शिवाजी ओलेकर सर , माजी सभापती अजितदादा कारंडे,जयवंत सरगर, जगन्नाथ कोळेकर, रामचंद्र पाटील, पै.रावसाहेब कोळेकर, सुभाष खांडेकर, मंजुनाथ कोळेकर, मोघमवाडी सरपंच गजनान ओलेकर, तानाजी शिंगाडे तसेच समाज बांधव, देवस्थान कमिटी ग्रामपंचायत पदाधिकारी व पुजारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)