जि.प.शाळा अलकूड एस चे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवित यश ....!!
कवठेमहांकाळ ;प्रतिनिधी
कवठेमंकाळ येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये अलकुड एस जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळवले .यामध्ये पन्नास मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अथर्व दीपक पाटील याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला व 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक मिळवला तसेच
रिले ५०×४ या क्रीडा प्रकारात मुलांचा प्रथम क्रमांक आला यामध्ये
१) अथर्व दीपक पाटील
२) सार्थक सुरज चौगुले
३) शौर्य दत्तात्रय गोरड
४) ओम ज्ञानेश्वर खामकर
हे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच मुलीचां संघ उत्तेजनार्थ राहिला. यामध्ये 50 ,100 मीटर धावणे व रीले संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले त्याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे ग्रामपंचायत , शाळा व्यस्थापन समिती व पालकांच्या वतीने अभिनंदन. करण्यात आले. यावेळी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक , शिक्षक सुरेखा खोत, ज्ञानेश्वर बुधवंत व देवाशिष बोबडे यांनी मार्गदर्शन केले .
फोटो ओळी; जि.प.शाळा अलकुड एस चे तालुका स्तरीय क्रीडा स्पधेत यश मिळालेले विद्यार्थी व सोबत मार्गदर्शक शिक्षक.
जिल्हा परिषद शाळा अलकुड एस चे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
By -
January 15, 2025
0
Post a Comment
0Comments