ग्रामपंचायतीच्या कामाची निविदा (टेन्डर) प्रक्रिया आणि अंदाजपत्रक (इस्टिमेन्ट) मराठी भाषेत करा..; युवराज ओलेकर यांची मागणी
कवठेमंकाळ प्रतिनिधी;
कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पाची वाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री गोविंदराव बिरुदेव ओलेकर यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे निविदा प्रक्रिया (टेन्डर) व अंदाजपत्रक (इस्टीमेन्ट) हे मराठी भाषेत उपलब्ध असावे अशी मागणी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली.
निवेदनात पुढे असे म्हंटले आहे की महाराष्ट्राची निर्मिती ही भाषिक प्रांतवार रचनेत झाली आहे .आपल्या महाराष्ट्र राज्याची मुख्य भाषा मराठी असताना सुद्धा ग्रामपंचायत मधील कामांचे अंदाजपत्रक (इस्टीमेन्ट) हे पुर्णतः इंग्रजी भाषेत असते .ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदांची पात्रता हि चौथी पास आहे हे इंग्रजी त्यांना कसे समजणार यातुनच गावातील विकासकामात पारदर्शकता आणण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाला ही समजण्यासाठी सहयोग होईल अशी महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायत सदस्य युवराज ओलेकर यांनीअपेक्षा व्यक्त केलीआहे.
Post a Comment
0Comments