yuva MAharashtra कवठेमंकाळ येथे उपविभागीय कार्यालय व्हावे ; संजय कोळी

कवठेमंकाळ येथे उपविभागीय कार्यालय व्हावे ; संजय कोळी

Admin
By -
0


कवठेमहांकाळ दी 12 .
कवठेमहांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व्हावे असे  निवेदन कवठेमहांकाळ च्या नायब तहसीलदार खुडे मॅडम यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी, गौसभाई शिरोळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले, वीरभद्र कोष्टी विरभद्र कोष्टी सोमनाथ लाटवडे, दत्ता दोडमिसे, बाळासाहेब ओलेकर ,आदित्य कारंडे इत्यादी उपस्थित होते. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिनांक 30-1-24रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन ना.उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित विभागास आदेश देण्यात आले, कवठे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय होण्यासाठी संबंधित विभागाने समीती गठीत करण्यात आली होती. या समीतीने लेखी अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 15/2/2024रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मिटींग आयोजित केली होती. या समीती पुढे कवठेमहांकाळ येथील अँड.उमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता. त्या वेळी इतर तालुक्यातील कोणी हजर नव्हते.कवठे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय होण्यासाठी विलंब होत आहे तरी कवठे महांकाळ तालुक्यातील जनतेच्या अडचणींचा विचार करून लवकरात लवकर  उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने दिनांक 24/12/2024 रोजी   तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ओबीसी विभाग च्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)