पुणे दि 17 : पुणे येथे अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य मिरवणूकीने गणपती बाप्पाला निरोप..
पुणे येथील गणपती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहेत. लोकमान्य टीळकांनी पहिला गणेशोत्सवची सुरुवात पुण्यातूनच केली. त्यामुळे पहिल्यापासूनचं पुण्याच्या गणपतीचं वैशिष्ट्यच वेगळ आहे. पुण्यातील गणपती बघण्यासाठी राज्यभरातील माणसं पुण्यात येत असतात.दिनांक 17 सप्टेंबर रोजी ढोल ताशा व डॉल्बीच्या गजरात पुणे येथील गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.
यावेळी कसबा गणपती, तुळशीबाग गणपती तसेच पुणे शहरातील सर्व मोठ्या मंडळाचे गणपती व मानाचे गणपती या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते...
काही मंडळाच्या समोर महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशात ढोल व ताशांचे गजरात मिरवणूक पुढे सरकत होती तर काही गणपती मंडळ डॉल्बीच्या मोठ्या आवाजासह सहभागी झाले होते. यावेळी पुण्यातील रस्ते माणसांच्या गर्दीने फुलून गेले होते.
यावेळी गणेश विसर्जन मिरवणूकी सोबत व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता
Post a Comment
0Comments