शालेय क्रीडा स्पर्धेत श्री. रेणुका विद्यालयाचे यश निखिलची जिल्हास्तरावर निवड तर आकाश माने यांची विभागीय स्तरावर निवड..
निखिलने तालुका स्तरावर पटकवला प्रथम क्रमांक व आकाश मानेने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक...
क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सांगली आयोजित कवठेमहांकाळ तालुकास्तरीय स्पर्धा श्री गिरीलिंग बहुउद्देशीय सेवा भावी संस्था संचलित शिवछत्रपती पुरस्कार कुस्ती प्रशिक्षण केंद्र कुकटोळी वस्ताद दिनकर हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या व जिल्हा स्तरीय सायकल शर्यत स्पर्धा अंकली ता.(मिरज) येथे पार पडल्या.
या शालेय कुस्ती स्पर्धेत श्री रेणुका विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि जय हनुमान तालीम कोकळे येथे वस्ताद रामचंद्र वगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेला पैलवान निखिल तानाजी शिंगाडे यांने झालेल्या तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 17 वर्षे वयोगट आणि 51 kg वजनी गटामध्ये श्री.रेणुका विद्यामंदिर कोकळे चा विद्यार्थी निखिल तानाजी शिंगाडे अटीतटीच्या लढतीमध्ये विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांची सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी आकाश संभाजी माने 17 वर्षे वयोगटात सायकल शर्यतीमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवुन त्याची विभागीयसाठी निवड झाली.
या निवडीबद्दल आमदार पडळकर यांनी निखिल व सायकल पटू आकाश यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच या प्रशालेतील या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक कोकरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच कोकळे करलहट्टी तसेच बसापाचीवाडीसह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0Comments