yuva MAharashtra मा.जयसिंगराव ( तात्या) शेंडगे वाढदिवस विशेषशांक

मा.जयसिंगराव ( तात्या) शेंडगे वाढदिवस विशेषशांक

Admin
By -
2 minute read
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगली चे अध्यक्ष मा.जयसिंगराव ( तात्या) शेंडगे यांचा आज वाढदिवस ........

बहुआयामी व्यक्तिमत्त्व,आमचे आधारस्तंभ तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)गटाचे नेते बहुजनांचा बुलंद आवाज आदरणीय मा.जयसिंगराव( तात्या) शेंडगे, एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणारा कॄतिशील आक्रमक बहुजनांचा नेता यांचा आज वाढदिवस, तात्यांनी आपले सामाजिक भान दाखवत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश करुन उद्या च्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे, चुलते समाज रत्न एन टी आरक्षणाचे जनक माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री कै.शिवाजीराव( बापू) शेंडगे यांच्या समृध्द विचारांच्या राजकारणाचा वारसा खरया अर्थाने तात्याच चालवत आहेत.प्रतिकुल आणि अनुकूल परिस्थितीत स्व ताच्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची व कार्यकर्ते जमवणे व त्यांना स्नेहाने वागविणे कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची उर्जा शेंडगे बापूंच्या कडूनच मिळाली असल्याची दाखवून दिले आहे, जनतेचे व समाजचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका मांडत असताना दिसतात अशाच मानसिकतेतून त्याचें समाज कार्य सुरू आहे,आपले धडाकेबाज कर्तव्य तत्परता समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्या साठी उपलब्ध करून दिलेले पर्याय,अशा सर्वच पातळ्यांवर तात्यांनी केलेले कार्य वेगळे दखलपात्र ठरावे . आज तात्यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ येथे दुर्लक्षित समाजातील घटकांसाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगली संचलित या संस्थेच्या माध्यमातून वात्सल्य मुकबधीर विद्यामंदिर कवठेमहांकाळ व शिवाजीराव (बापू) शेंडगे निवासी मतिमंद मुलांचे विद्यालय कवठेमहांकाळ या शाळा सुरू आहेत, कर्णबधीर व गतिमंद व मतिमंद दिव्यांग शेकडो मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू आहे तात्यांच्या मार्ग दर्शनानुसार मुकबधीर व मतिमंद मुलांनी जिल्हा व राज्य पातळीवर क्रिडा व चित्रकला ,स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत , गोरगरीब व दिनदुबळया समाजातील मुलांच्या शिक्षणाचा व वस्तीगृहाचा खर्च स्वतः तात्या च करत आहेत.प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाची आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎈🎈🎈🎈🎈.
शुभेच्छुक , विजय ठेंगील सर. मुख्याध्यापक , शिवाजीराव (बापू) शेंडगे निवासी मतिमंद मुलांचे विद्यालय कवठेमहांकाळ

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)