*ओबीसीचें, धनगर समाजाचे, भटक्या विमुक्तांचे, गोरगरीब कष्टकऱ्यांचे, कामगाराचे कैवारी माजी मंत्री. शिवाजीराव (बापू )शेंडगे*
दुष्काळी पट्ट्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ तालुक्यातील केरेवाडी सारख्या गावामध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन स्वकर्तुत्वावर राज्यकर्ता बनण्याचे सामर्थ्य दाखवून मेंढपाळ करणाऱ्या भटक्या-विमुक्त, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी मंत्री, समाजरत्न, आमदार, शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील धनगर समाज शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जागृत झाला. प्रगतशील झाला. स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव बापू शेंडगे यांनी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी, उज्वल भविष्यासाठी, विकासासाठी व भटक्या मुक्त असलेल्या शैक्षणिक विकासापासून कोसो दूर असलेल्या, शेळी मेंढी पालन करून महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वाड्यावर, वस्त्यावर, डोंगराळ भागात आपलं जीवन जगणाऱ्या धनगर समाजाच्या जीवनामध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचं काम स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव बापू शेंडगे यांनी केले आहे त्यांची आज 23 व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या जीवन कार्य वर थोडासा टाकलेला प्रकाश..!
माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कृष्णराव शेंडगे उर्फ बापू, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खेडयातून राज्याच्या राजधानीपर्यंत पोहचलेलं नेतृत्व. केरेवाडी सारख्या दुष्काळी भागातील खेडयात जन्माला आलेले बापू, स्वकर्तृत्वावर मंत्रालयातील राज्यमंत्र्यांच्या केबीनमध्ये जावून मंत्र्यांच्या खुर्चीत आरूढ होतील. हे स्वप्नातही कोणाला वाटले नसते. परंतु संघटन कौशल्य, मधुरवाणी, साधी राहणी, सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची सवय, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव. या त्यांच्या गुणांमुळेच शिवाजीचे शिवाजीराव झाले. दुष्काळग्रस्त भागातील सर्व सामान्यांचे दैवत झाले. राज्यातील तमाम धनगर समाजाचे कैवारी ठरले.
बापू केरेवाडीचे असले तरी त्यांचा उमेदीचा काळ मुंबईत गेला. मुंबईतील गोदीशी आणि बंदराशी एकरूप झालेले बापू नकळत राजकारणात आले आणि तमाम धनगर समाजाचा पांग फिटला.
महाराष्ट्र राज्यामध्ये आज धनगर समाजाच्या घराघरांमध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, इंजिनीयर, डॉक्टर इत्यादी अनेक ज्या काही नोकऱ्या मिळालेल्या आहेत ती फक्त आणि फक्त माजी मंत्री स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांची देणं आहे. माजी मंत्री स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी अनेक वर्ष संघर्ष करत राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्याच काळामध्ये त्यांनी काँग्रेस नेते तथा तेव्हाचे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जवळीकता साधली व त्या जवळीकतेच्या माध्यमातून लाखो लोकांचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी काँग्रेस नेते तथा तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून शब्द घेत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या जीवनामध्ये गत वैभव निर्माण केले. त्या माध्यमातून त्यांनी जनसंख्या व दबाव तंत्र दाखवत महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त मेंढपाळ वाड्यावर वस्त्यावर डोंगरदऱ्यामध्ये जीवन जगणाऱ्या मेंढपाळाच्या जीवनामध्ये आनंद भरला. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला ओबीसी एनटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून राज्यातील धनगर समाजाला एका प्रकारे विकासाच्या शैक्षणिक दृष्ट्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनी केले. त्यांच्या आरक्षणाच्या या देणगीमुळे वाड्यावर, वस्त्यावर, डोंगरदऱ्यात फिरून उपजीविका भागवणाऱ्या मेंढपाळाच्या पोराच्या हातामध्ये शेळी मेंढी राखण्यासाठी काठी नव्हे तर जीवनाचा उद्धार करण्यासाठी पेन मिळाला. वही पाटी मिळाली, पेन्सिल मिळाली आणि धनगर समाजाच्या युवकांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आज महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढपाळाच्या घरामध्ये आयएएस, आयपीएस, आय आर एस, त्याचबरोबर इतर सर्व नोकऱ्या व स्कॉलरशिप यामध्ये जे काही मिळत आहे ती देन या राज्यातील दानसूर असणाऱ्या शेंडगे कुटुंबाकडून मिळालेली आहे. सध्या बापूंच्या पावलावर पाऊल देऊन पुढे धनगर समाजाचा गाडा घेऊन जाण्याचे काम मा. आ. प्रकाश अण्णा शिवाजीराव शेंडगे साहेब, मा. आ. रमेश भाऊ शिवाजीराव शेंडगे, मा. सुरेश भाऊ शिवाजीराव शेंडगे, मा. संदीप भाऊ शिवाजीराव शेंडगे, मा. जयसिंग तात्या शेंडगे हे करत आहेत. सामान्य माणसाचे धनगर समाजाच्या पोरांचे कोणत्याही प्रकारचे काम असेल ते सोडवण्यासाठी तत्पर असतात. आपल्या वडिलांचा वारसा पुढे आपण चांगल्या प्रकारे चालवला पाहिजे समाजाचं काहीतरी देन लागतो हा उद्देश मनाशी बाळगून मनाशी गाठ बांधून अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याचबरोबर अतिविशेष म्हणजे जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश आण्णा शिवाजीराव शेंडगे हे देखील माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांचे विचार तळागाळातील ओबीसी व धनगर समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत. त्यांनी ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष सर्व ओबीसींच्या समान न्याय हक्कासाठी निर्माण केला आहे. अहिल्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी धनगर समाजातील मुलांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अहिल्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश आबा शिवाजीराव शेंडगे हे देखील मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत. संदीपभाऊ शेंडगे हे आंतरराष्ट्रीय व्यापार पाहतात. या चारही बंधूंनी राज्यातील धनगर समाजातील सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देता येईल हा उद्देश मनाशी बाळगलेला आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांचे विचार आत्मसात करून हे चारही बंधू काम करताना राज्यामध्ये दिसत आहेत सतत कार्यतत्पर असणारे बापूंच्या विचाराचा वारसा अविरहित पणे रात्रंदिवस धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी शेंडगे कुटुंबीय महाराष्ट्रभर संघर्ष करताना दिसतात. आज बापूंच्या विचाराचे वारसदार म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं बापूंना केलेले काम आपणही केले पाहिजे हा चंग मनाशी बाळगून शेंडगे कुटुंबीय काम करत आहेत. त्याचबरोबर जयसिंग तात्या शेंडगे हेदेखील अतिशय तळमळीने समाजाला उन्नतीच्या विकासाच्या दृष्टीने काम करत आहेत. ते नक्कीच बापूंच्या विचारांशी कायम नाळ जोडून असलेले शेंडगे कुटुंब हे समाजाला उन्नतीच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेला घेऊन जाईल. बापूंचा मानस होता की या राज्यातल्या धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे आणि ते मिळवण्यासाठी हे कुटुंब आजही संघर्ष करत आहे. त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुन्हा या राज्यातल्या धनगर समाजाच्या घरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. बापूंच्या एनटी, एसटी, ओबीसी आरक्षणाच्या देणंमुळे आज राज्यातील भटक्या विमुक्त भटकती करणारा धनगर समाज विकासाच्या प्रवाहामध्ये आलेला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांचीच विचारधारा शेंडगे कुटुंब आगामी काळातही नक्कीच कायम ठेवत पुढे जाईल अशी या राज्यातल्या धनगर समाजाला आशा आहे. आज माजी मंत्री स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांची 23 वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस राज्यातल्या तमाम जनतेकडून विनम्र अभिवादन..!
Post a Comment
0Comments