कवठेमहांकाळ ,दि,31 .प्रतिनिधी.
कवठेमहांकाळ तालुक्यातील महत्वाची समजली जाणाऱ्या कोकळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती बाळासाहेब ओलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच विजय भाऊ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड संपन्न झाल्या.यावेळीनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी एस बुरुटे यांनी काम पाहिले .अमित कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी अमित कांबळे यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी, उद्योजक धनाजी (नाना) भोसले, अजित कारंडे, तानाजी शिंगाडे.
राम हेगडे, सलीम तांबोळी, अनिल पाटील, तानाजी ओलेकर, विकास ओलेकर, अतुल ओलेकर, सयाजी कांबळे, भारत माने, महेश हेगडे, उत्तम कांबळे, संजय पवार अशोक माने, डाटा ऑपरेटर प्रदीप कांबळे, शिपाई धनाजी कांबळे शिपाई तानाजी कांबळे इत्यादी उपस्थित होते . निवडीबद्दल कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0Comments